दुर्दैवी ! बापलेकांसह नातूचा धरणात बुडून मृत्यू
दुर्दैवी ! बापलेकांसह नातूचा धरणात बुडून मृत्यू
img
Nandini khandare More
नाशिक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथे सातवडे धरणात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. भूषण रघुनाथ कर्नर (वय 13), हरी बाबू गोयेकर (वय 28) आणि बाबू घुटा गोयेकर (वय 54) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे कजवाडे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कजवाडे येथील हरी बाबू भोयेकर (28) व भूषण रघुनाथ कन्नोर (13),) हे मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गावालगत असलेल्या सातवडी तलावावर गेले असता भूषणचा तोल जाऊन तो तलावात पडून बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी हरी भोयेकर यांनी देखील उडी मारली हे दोघे बुडू लागल्याचे लक्षात येताच जवळच असलेल्या बाबू गुठा भोवेकर (54) यांनी देखील मुलगा व नातूला वाचविण्यासाठी तलावात उडी मारली.

पाण्यात  बुडत असलेल्या या दोघांनी बाबू भोवेकर यांना पकडल्याने ते देखील त्यांच्याबरोबर पाण्यात बुडाले. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येतात त्यांनी तलावाकडे धाव घेतली. मात्र, तिघेही पाण्यात बुडाले होते. ग्रामस्थांनी दोन ते अडीच तासाच्या परिश्रमानंतर तिघांचे मृतदेहतलावाबाहेर काढले. पिता-पुत्रासह नातूचा देखील या दुर्दैवी घटनेत अंत झाल्याने कजवाडेसह काटवण परिसरात
इतर बातम्या
Join Whatsapp Group