नाशिकमध्ये उद्या
नाशिकमध्ये उद्या "या" भागातील वीज पुरवठा ६ तास बंद राहणार
img
दैनिक भ्रमर

नाशिक : नाशिक शहरातील १३२ केव्ही म्हसरूळ उपकेंद्र अंतर्गत ३३ केव्ही पंपिंग विद्युत वाहिनीवर देखभाल व दुरुस्तीचे काम महापारेषणच्यावतीने तसेच महावितरणकडून ११ केव्ही सहदेव नगर विद्युत वाहिनीवर आणि कॅम्पस विद्युत उपकेंद्र मधील ११ केव्ही सिटी ३ विद्युत वाहिनी देखभाल व दुरुस्तीच्या काम करण्यात येणार असल्याने उद्या (दि.३) सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत पर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे.

वीज पुरवठा बंद असल्याने खालील परिसरातील वीज पुरवठा प्रभावित राहील. यामध्ये सहदेवनगर (गंगापूर रोड) विद्युत वाहिनीवरील दत्त मंदिर चौक, सुयोजित गार्डन, सहदेव नगर, आयचित नगर,साई चौक, दादाजी कोंडदेव नगर, शांतिनिकेतन कॉलनी, नक्षत्र कॉलनी, पूर्णवाद नगर, भाजी बाजार, प्रसाद सर्कल व परिसर.

तसेच सिटी ३ विद्युत वाहिनी वरील एबीबी सर्कल, महात्मा नगर, सावरकर नगर, गंगापूर पोलिस स्टेशन परिसर, दामोदर चौक, शंकर नगर, संत कबीर नगर, काळे नगर २ आणि  गुरुजी रुग्णालय परिसर याचा समावेश आहे. 

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळे अगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा  सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group