६ मे २०२६
वाशी सेक्टर ९ येथील एका पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. निर्माणाधीन इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून पडून २९ वर्षीय तरुण मजुराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या भीषण अपघाताने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याप्रकरणी वाशी पोलिसांनी संबंधित विकासक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. वाशी सेक्टर ९ येथील पुनर्विकास प्रकल्पावर काम करताना 27 व्या मजल्यावरून पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित विकासक आणि कंत्राटदाराविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 वर्षीय इमरान इब्राहीम खान हा आपल्या भावासह काम करत असताना ही दुर्घटना घडली. वाशी सेक्टर 9 येथील पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू असणाऱ्या निर्माणाधीन इमारतीच्या 27 व्या मजल्यावर पीओपी सीटचे काम करत असताना तोल गेल्याने इमरान खान या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणी संबंधित विकासक आणि त्याचा कंत्राटदार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Copyright ©2026 Bhramar