धक्कादायक ! भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्याला बेदम मारहाण
धक्कादायक ! भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्याला बेदम मारहाण
img
Nandini khandare More

 डोंबिवलीत शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याने खळबळ उडाली.  दरम्यान,  या प्रकरणी  डोंबिवली पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक केली. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

महाडमधील पाणी पुरठवड्याच्या प्रश्नावर भाजप नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना बेदम मारहाण केली. त्यांना त्यांच्या दालनात घुसून मारहाण करण्यात आल्याचे समोर आलं आहे. या घटनेनंतर सत्ताधारी नगरसेवकाच्या विरोधात नगरपरिषदेतदील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी नगरसेवक सूरज बामणे आणि त्यांच्या तीन कार्यकर्त्यांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे दुपारच्या सुमारास नगरपरिषदेच्या दालनात कामकाज करत होते. त्यावेळी नगरसेवक सूरज बामणे आले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील होते. त्यांनी महाडच्या प्रभाग क्रमांक 6 मधील पाणीपुरवठ्याचा प्रश्नावरवरून मुख्यधिकाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या दादागिरीनंतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नगरसेवकावर कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन करू , असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. मारहाण केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

तत्पूर्वी, पोलिसांत प्रकरण पोहोचल्यानंतर मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कडकडीत निषेध नोंदवला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी दोन दिवस कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. बामणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार झाल्यानंतर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group