महाराष्ट्रावर दुहेरी संकट! एका बाजूला सूर्याचा प्रकोप, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा 'यलो अलर्ट'; १५ जिल्ह्यांना इशारा
महाराष्ट्रावर दुहेरी संकट! एका बाजूला सूर्याचा प्रकोप, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा 'यलो अलर्ट'; १५ जिल्ह्यांना इशारा
img
नितीशा कुलकर्णी






सध्या महाराष्ट्राच्या वातावरणात मोठे बदल होत आहेत. ऐन उन्हाळ्यात कोकण ते विदर्भ महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं मोठ संकट घोंघावत आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ. हाराष्ट्रावर वादळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचं दुहेरी संकट घोंघावत आहे. गुरुवारी विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट होता. तर मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली. आज पुन्हा उष्णतेचा पारा चढलेला असतानाच वादळी संकट झोडपणार आहे. हवामान विभागाने 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट आहे.

पुढील 48 तासांसाठी पुन्हा हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. गुरुवारी मुंबईसह कोकण किनापरट्टीवर पावसाने हजेरी लावली. आज पुन्हा हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32-36 अंशांच्या दरम्यान राहील. किनारपट्टीवर उकाडा जाणवेल आणि आद्रता जास्त राहील. मध्य महाराष्ट्रात देखील वादळी संकटाचा धोका कायम आहे. गुरुवारी कोल्हापूरसह काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. आज पुन्हा पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात पावसाची शक्यता आहे.

तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ताशी 40-50 किमी वेगाने वाऱ्यांसह गडगडाटी पाऊस होईल. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. अहिल्यानगर परिसरात तुरळक पावसाची शक्यता असली तरी धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक परसिरात हवामान कोरडे राहील. कमाल तापमान 37-40 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यात उन्हाचा कडाका वाढला आहे.

कमाल तापमान 36-40 अंशांपर्यंत राहील. गुरुवारी 40-50 किमीच्या वेगवान वाऱ्यांसह काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. आज पुन्हा लातूर, धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भाला गुरुवारी अवकाळीचा ऑरेंज अलर्ट होता. नागपूर, अमरावतीसह बहुतांश जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह गडगडाटी पाऊस झाला. आज पुन्हा काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पुन्हा यलो अलर्ट असेल. कमाल तापमान 39-42 अंशांच्या दरम्यान राहील. दरम्यान, महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पुढील 48 तास महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम असेल. त्यानंतर हवामानात मोठ्या बदलांची शक्यता आहे. तोपर्यंत शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

इतर बातम्या
Join Whatsapp Group