ताजी मासळी, सोबतीला गरम भात आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण घातलेलं माशाचं कालवण... हे नाव काढलं तरी मासेप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं. पण, मुंबईसारख्या शहरात खिशाला परवडणारे आणि ताजे मासे नेमके कुठे मिळतात? जर तुम्हीही स्वस्त आणि मस्त माशांच्या शोधात असाल, तर मुंबईतील ही काही प्रसिद्ध ठिकाणे तुमच्यासाठी जणू नंदनवनच आहेत. भाऊच्या धक्क्यापासून ते ससून डॉकपर्यंत, जाणून घेऊया मुंबईतील गाजलेल्या फिश मार्केटबद्दल...
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध फिश मार्केट म्हणजे भाऊचा धक्का... भाऊचा धक्का मुंबईतील सर्वात मोठं फिश मार्केट आहे. या बाजारात अनेक मासे प्रेमी मासे खरेदी करण्यासाठी येतात. भाऊचा धक्का या बाजारात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात मासे खरेदी करता येतात. ससून डॉक देखील सर्वात मोठा मुंबईतील फिश मार्केट आहे. सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेला ससून डॉक सर्वात जुना आणि सर्वात मोठा फिश मार्केट आहे... ससून डॉकमध्ये अनेक प्रकारचे मासे उपलब्ध असतात. याठिकाणी मासे परवडणाऱ्या दरात मिळतात..
ससून डॉक देखील सर्वात मोठा मुंबईतील फिश मार्केट आहे. सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेला ससून डॉक सर्वात जुना आणि सर्वात मोठा फिश मार्केट आहे... ससून डॉकमध्ये अनेक प्रकारचे मासे उपलब्ध असतात. याठिकाणी मासे परवडणाऱ्या दरात मिळतात.. सायन फिश मार्केट अनेकांना माहिती आहे. सायन मार्केट मुंबईतील एक मासळी मार्केट ज्यामध्ये खेकडे देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही येथे कमी प्रमाणात मासे देखील खरेदी करू शकता. दादर फिश मार्केट तर फार मोठं असून हे फिश मार्केट स्टेशनच्या अगदी जवळ आहे. दादर स्टेशनजवळ मोठं मार्केट आहे. याठिकाणी फळं, भाज्या आणि फिश मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मासे परवडणाऱ्या दरात असतात. येथे मासे घेण्यासाठी अनेक मासेप्रेमी येत असतात.