शासनाने जेष्ठांसाठीप्रवासात अनेक सवलती दिल्या आहेत. 75 वर्षांवरील जेष्ठ प्रवाशांना शासनाकडून एसटीच्या तिकिट दरामध्ये 100 टक्के सवलत मिळते. मात्र प्रवाशांना ही सवलत दिलेली असतांना देखील प्रवाशांमध्ये आणि कंडक्टरमध्ये दोन रूपयांसाठी वाद होताना दिसत आहेत. या मागचे नेमके कारण काय आहे जाणून घ्या. खेड्या पाड्यासह शहरी भागातही एसटी प्रवास नागरिकांकडून केला जात आहे.
एसटी प्रवासाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी एसटी प्रवासामध्ये विशेष सूट आहे. एसटी प्रवास 75 वर्षांवरील प्रवाशांना शासनाकडून तिकिट भाड्यामध्ये 100 टक्के सवलत दिली जात आहे. प्रवासावर ही सवलत दिली जात असताना प्रवाशांमध्ये आणि कंडक्टरमध्ये दोन रूपयांसाठी वाद होताना दिसत आहेत.
सर्व तिकिट फ्री असताना तिकिट कंडक्टर वृद्ध नागरिकांकडून दोन रूपये कसले घेतात? असा सवाल नागरिकांकडून बऱ्याचदा विचारला जातो. ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवासाची सुविधा असतानाही त्यांच्याकडून दोन रूपये आकारले जात आहेत. यामुळे सुट्ट्या पैशांवरून ज्येष्ठ नागरिक प्रवाशांमध्ये आणि कंडक्टर्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाद होताना दिसत आहेत. हे दोन रूपये 'स्वच्छता अधिभार' म्हणून घेतले जात आहे. हे पैसे प्रत्येक प्रवाशांकडून आकारले जात आहेत. अगदी महिलांकडून सुद्धा 'स्वच्छता अधिभार' दोन रूपये आकारले जात आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्यामुळे नागरिकांकडून अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. प्रत्येक प्रवाशाकडून हे पैसे आकारले जात आहेत. तिकिट प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे अधिभार आकारणी आणि परताव्यात गोंधळ निर्माण होत असून प्रवासी आणि कर्मचारी कंटाळले आहेत.
कारण सध्या वाहकांकडे वेळेवर सुट्टे पैसे नसल्यामुळे अनेकदा वादही होत असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही विशिष्ट श्रेणीतील अधिकृत सवलतधारक प्रवाशांना या 'स्वच्छता अधिभार' मधून सूट दिली जाणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. हा 'स्वच्छता अधिभार' प्रवाशांना प्रवास भाड्या व्यतिरिक्त ही ज्यादाची रक्कम तिकिटामध्ये समाविष्ट केली जात आहे. सध्या ह्या जादाच्या रक्कमेमुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.