एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज  ! महागाई भत्त्यात मोठी वाढ; आणि पगारात थेट ..
एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! महागाई भत्त्यात मोठी वाढ; आणि पगारात थेट ..
img
Nandini khandare More

राज्यसरकारडून काही महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आहेत. दरम्यान आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण आता राज्य सरकारने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थेट पाच टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , या निर्णयाचा अनेक एसटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तसेच घरभाडे भत्ता 10%, 20% आणि 30% पर्यंत वाढवण्यात आला असून वार्षिक वेतनवाढीचा दरही 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळणार असून संभाव्य संप टळण्यास मदत झाली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group