केंद्र सरकारने सर्वसामान्या नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक लाभदायी योजना सुरू केल्या आहेत. तुम्हाला सरकारच्या कोणकोणत्या योजनांबद्दल माहिती आहे. सरकारने नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी विविध सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आहेत. मात्र, या योजनांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचलेली नसते. अल्प प्रीमियम किंवा कमी गुंतवणुकीत मोठा लाभ देणाऱ्या या योजनांमुळे नागरिकांना विमा संरक्षण, पेन्शन आणि आर्थिक स्थैर्य मिळू शकते. अशाच पाच महत्त्वाच्या योजनांचा कोणत्या आहेत जाणून घ्या.
१) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे. फेरीवाले, बांधकाम कामगार, रिक्षाचालक, मच्छिमार, कचरा वेचणारे अशा विविध घटकांचा यात समावेश होतो.
पात्रता - १८ ते ४० वयोगटातील भारतीय नागरिक, ज्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. संबंधित व्यक्ती EPFO, ESIC किंवा NPS ची सदस्य नसावी.
लाभ - दरमहा ५५ ते २०० रुपये हप्ता भरावा लागतो, ज्यातील अर्धी रक्कम केंद्र सरकार देते. ६० वर्षांनंतर ३,००० रुपये मासिक पेन्शन मिळते. मृत्यूनंतर जोडीदाराला ५०% पेन्शन मिळते.
राष्ट्रीय पेन्शन योजना
दुकानदार, लघु व्यावसायिक आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त आहे.
पात्रता - १८ ते ४० वर्षे वयोगट, वार्षिक उलाढाल १.५ कोटींपेक्षा कमी. PM-SYM, EPFO किंवा ESICचा लाभ घेतलेला नसावा.
लाभ - दरमहा ५५ ते २०० रुपयांचा हप्ता भरल्यावर ६० वर्षांनंतर ३,००० रुपये पेन्शन मिळते. यातही केंद्र सरकार समान योगदान देते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
ही जीवन विमा योजना अत्यल्प प्रीमियममध्ये मोठे संरक्षण देते.
पात्रता - १८ ते ५० वयोगटातील भारतीय नागरिक. बँक खाते (विशेषतः जनधन खाते) आवश्यक.
लाभ - दरवर्षी ३३० रुपये प्रीमियम भरल्यास मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाख रुपये विमा रक्कम मिळते.
४) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
ही अपघाती विमा योजना अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध आहे.
पात्रता - १८ ते ७० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक. बँक खाते आणि आधार आवश्यक.
लाभ - वर्षाला फक्त १२ रुपये प्रीमियम. अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्वासाठी २ लाख रुपये, तर अंशतः अपंगत्वासाठी १ लाख रुपये मिळतात.
५)अटल पेन्शन योजना
वृद्धापकाळात निश्चित उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.
पात्रता - १८ ते ४० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक. बँक खाते आणि आधार लिंक असणे आवश्यक.
लाभ - १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत मासिक पेन्शनची हमी. लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर ही रक्कम पती/पत्नीला मिळते.