दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा बिगुल वाजला! ८ मे रोजी होणार फैसला; निवडणूक कार्यक्रम जाहीर
दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा बिगुल वाजला! ८ मे रोजी होणार फैसला; निवडणूक कार्यक्रम जाहीर
img
नितीशा कुलकर्णी








दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. ८ रोजी निकाल लागणार आहे. नगराध्यक्षा सुनीता लहांगे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तो मंजूर केला होता. यानंतर आज (बुधवार) नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आज दि. २९ रोजी कार्यालयीन वेळेत व दि. ३० रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन देणे व स्विकारण्यात येणार आहे.

तसेच दि. ३० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्राची छाननी होणार आहे. त्यानंतर ५ वाजता नामनिर्देशनपत्रे छाननीनंतर किती अर्ज फेटाळण्यात आली आहेत त्या उमेद्वारांची नावे आणि फेटाळण्याची कारणे सूचना फलकावर प्रसिध्द केली जाणार आहेत. तर दि. ३० रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पिठासिन अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्याचा कालावधी लागणार आहे.

तसेच दि. ७ रोजी ११ वाजता वैध नामनिर्देशनपत्रांची यादी सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर दि. ७ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशन मागे घेता येणार आहे. यानंतर दि. ८ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक लढविणार्‍या व उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची  नावे सभेत वाचून दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर मुद्दा क्र.९ च्या कामकाजानंतर लगेचच अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल व निकाल घोषित करण्यात येईल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group