पावसाची जोरदार बॅटिंग ! नाशिकला रेड अलर्ट
पावसाची जोरदार बॅटिंग ! नाशिकला रेड अलर्ट
img
Nandini khandare More

राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.दरम्यान, नाशिक जिल्ह्यासाठी पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 2,498 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group