नाशिक शहरातील
नाशिक शहरातील
img
दैनिक भ्रमर
नाशिक : नाशिक शहरामधील  मखमालबाद उपकेंद्र अंतर्गत असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठ ११ केव्ही विद्युत  वाहिनीच्या  देखभाल व दुरुस्तीसाठी  तसेच  द्वारका १ कक्ष अंतर्गत  सारडा  व गोदावरी वाहिनी वर असलेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने अंडरपास रस्त्याचे काम सुरू असल्याने  त्यांच्या महत्वाच्या कामानिमित्त या दोन्ही भागातील वीज पुरवठा शनिवारी ४ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. या पूर्वी दि. १ जुलै रोजी द्वारका चौकातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार होता मात्र तांत्रिक कारणांमुळे ते काम स्थगित करण्यात आले होते. 

आरोग्य विज्ञान विद्यापीठ ११ केव्ही विद्युत वाहिनीवरील बंद राहणाऱ्या भागामध्ये मखमलाबाद गाव, स्वामी विवेकानंद नगर, इरिगेशन कॉलनी, तिडके नगर, गावरान हॉटेल, नमन हॉटेल, शांती नगर, कंसारा चौफुली, ओंकार नगर,  चाणक्य पुरी, राऊ हॉटेल,  चांदवडकर नगर,  तवली फाटा,  मेघराज बेकरी, भगवान बाबा नगर,  शंकर नगर,  राम नगर,  सावंत पेट्रोल पम्प,  शिंदे मळा,  मुंगसरा शिवार,  मातोरी शिवार व परिसर यांचा समावेश आहे._ 

> तसेच सारडा व गोदावरी वाहिनीवरील असलेल्या १२ विद्युत रोहीत्रावरील वीज पुरवठा बंद असणार आहे या मध्ये बागवान पुरा, द्वारका सर्कल, वडाळा नाका, कपूर मार्केट, मोठा राजवाडा, चौक मंडई, चित्रकूट, कावेरी हॉटेल एरिया, बेले लेन, रेणुका नगर, आझाद चौक व परिसर यांचा समावेश असेल.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ व २ यांच्याकडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group