धक्कादायक ! लसीकरणानंतर काही मिनिटांतच १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू
धक्कादायक ! लसीकरणानंतर काही मिनिटांतच १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू
img
Nandini khandare More

नाशिकच्या खुटवडनगर परिसरात महापालिकेच्या लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर काही वेळातच १६ वर्षीय मुलगी अचानक चक्कर येऊन कोसळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , लसीकरणानंतर १६ वर्षीय श्रावणी पाटील या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात घटसर्प आणि धनुर्वात प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात लसीकरणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. 

नाशिकच्या खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात १६ वर्षीय श्रावणी पाटील हिने घटसर्प आणि धनुर्वात प्रतिबंधक लस घेतली होती. लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. लसीकरणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रशासन सत्य लपवत असल्याचाही आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. चौकशीसाठी विशेष वैद्यकीय पथक नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group