नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने ! मोठा गोंधळ
नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने ! मोठा गोंधळ
img
Nandini khandare More
काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्याचे पडसाद नाशकातही उमटले.  नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या ‘गुंगी गुडिया’ वक्तव्याविरोधात आज नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक दिसली. 

 आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाकडे चाल करून आले. त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तर त्याचवेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरल्याने मोठी चकमक घडण्याची शक्यता निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. तरीही दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू होत्या. नाशकात मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी राष्ट्रवादीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला चप्पल मारो आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसविरोधात जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस, हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात घोषणा दिल्या. काँग्रेस कार्यालयाकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले. तर दुसरीकडून काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू होती. यावेळी एकच गोंधळ उडाला.

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार निदर्शने करण्यात आली. आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांची आंदोलनात उपस्थिती होती. मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आंदोलनादरम्यान काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group