INDIA आघाडीच्या मोर्चात संजय राऊतांना आली भोवळ
INDIA आघाडीच्या मोर्चात संजय राऊतांना आली भोवळ
img
Nandini khandare More

देशात सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मोठा गदारोळ सुरु आहे.  ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी INDIA आघाडीने दिल्लीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राजधानी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधकांचा आक्रमक मोर्चा निघाला आहे. इंडिया (INDIA) आघाडीच्या खासदारांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा अडवण्यात आला असून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलनादरम्यान कडक उन्हाचा त्रास झाल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना अचानक भोवळ आली

इंडिया आघाडीतील 19 घटक पक्षातील खासदारांनी संसद ते केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय असा मोर्चा काढला. खासदारांनी तीन किलोमीटरचे अंतर पायी कापले. अंगाची लाही लाही करणारे ऊन असताना आकाशवाणी भवनाच्या गेट क्रमांक 3 वर विरोधी गोटातील खासदारांनी ठिय्या आंदोलन दिले. त्याचा फटका उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांना बसला. या ऊन्हाचा त्यांना त्रास झाला.  त्यांना तातडीने सावलीत नेण्यात आले. उन्हाच्या त्रासामुळे त्यांना चक्कर आल्याची माहिती समोर आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group