बंडखोरी भोवली! भाजपचा तीन बड्या नेत्यांना दणका; ६ वर्षांसाठी केले निलंबित
बंडखोरी भोवली! भाजपचा तीन बड्या नेत्यांना दणका; ६ वर्षांसाठी केले निलंबित
img
Nandini khandare More
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.भाजपने तीन बड्या नेत्यांना दणका देत मोठी कारवाई केली आहे. 

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भाजपने अत्यंत कठोर कारवाई केली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्या विरोधात आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे भाजपमधील काही जणांनी बंडखोरी केली होती. पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या या बंडखोरांवर आता भाजपने थेट निलंबनाचा बडगा उगारला आहे.

या नेत्यांवर झाली कारवाई पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन उमेदवारी कायम ठेवल्यामुळे संगीता शिंदे, चंद्रशेखर भोयर आणि सुमित पवार या भाजप नेत्यांवर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. या तिन्ही बंडखोरांना पक्षातून तब्बल सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. महायुतीमधील अधिकृत उमेदवाराविरोधात जाऊन काम करणाऱ्यांवर भाजपने कडक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्याविरोधात उमेदवारी कायम ठेवल्याने कारवाईचा निर्णय भाजपने घेतला आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतल्याने संबंधित तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group