राज्य सरकारचे सर्व पालकमंत्र्यांना तातडीने आदेश !
राज्य सरकारचे सर्व पालकमंत्र्यांना तातडीने आदेश !
img
Nandini khandare More

सध्या राज्यातील राजकारणात मोठ्या  घडामोडी घडत असून राज्यसरकारडून अनेक मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. याचदरम्यान आता राज्य सरकारचे सर्व पालकमंत्र्यांना तातडीने आदेश दिले असल्याची अपडेट समोर आली आहे. 

राज्यात दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सर्व विभागांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सर्वच विभाग कामाला लागले आहेत. या विभागांकडून अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे, असं सांगतानाच सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनाही शेतात जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मीडियाशी संवाद साधताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना जिल्ह्यात जाऊन शेतीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व आमदारांना मतदारसंघात जाऊन शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास सांगितलं आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जाऊन सर्वच पाहणी करणार आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

कृत्रिम पाऊस नाहीच
राज्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक भागातून कृत्रिम पावसाची मागणी होत आहे. मात्र, कृत्रिम पावसाची ही मागणी बावनकुळे यांनी फेटाळून लावली आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग कधीही यशस्वी झालेला नाहीये. परतीच्या पावसाला अजून वेळ आहे. त्यातून थोडा दिलासा मिळाल्यास उत्तम, असं बवनकुळे म्हणाले.

गौन खनिज खरेदी होणार
महाखनिज 2.0 काल दिलेले आहे. संपूर्ण राज्याचं मॉनिटरिंग होईल. अवैध वाहतूक थांबवण्याचं लक्ष, नियमात मोठे बदल, गौन खनिज नियमावलीतही बदल करणार आहे. घर बांधण्यासाठी किती वाळू लागेल आपणच सांगायच आहे. त्यामुळे राज्य सरकारला 25 कोटींचा अधिकचा महसूल मिळणार आहे. नियमाप्रमाणे गौन खनिज खरेदी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group