मोठी बातमी !  ''या'' तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; कोणाची लागणार लॉटरी?
मोठी बातमी ! ''या'' तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; कोणाची लागणार लॉटरी?
img
Nandini khandare More


राजकीय  घडामोडींना वेग आला असून आता मोठ्या हालचाली  सुरु आहेत. दरम्यान आता एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. 
ऑपरेशन टायगरनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पहिल्यांदाच दिल्लीत दाखल होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 17 जुलै रोजी होणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार असल्याचे समजते. ठाकरे सेनेतून आलेल्या सहा खासदारांमध्ये मंत्रि‍पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची बैठक होणार आहे. तर चार्टड विमानाने खासदार  आजच दिल्लीला रवाना होणार असल्याचे समजते.

केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेटमंत्री व राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्री पद दिले जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. तर राज्यमंत्री पदासाठी नव्याने आलेल्या ६ खासदारांमध्ये रस्सीखेच असल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.

17 तारखेला केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या खासदारांना चार्टड विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना होणार आहेत. आज रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या सर्व खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे असे समजते.


दरम्यान या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला स्थान मिळणार की नाही याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तारात सहभागाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाले नसल्याचे समोर येत आहे. एनडीएत सहभागी झाल्यापासून पक्षाने राज्यमंत्री पदाऐवजी कॅबिनेटची मागणी लावून धरलेली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group