नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयाच''हे'' आहे कारण ? संशोधकांनी काय सांगितले ?
नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयाच''हे'' आहे कारण ? संशोधकांनी काय सांगितले ?
img
Nandini khandare More

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या फ्लॅश फ्लडने भयंकर हाहाकार माजला आहे. हजारो लोक बेपत्ता आहेत. यात मोठ्या संख्येने भारतीयही समाविष्ट आहेत. आतापर्यंत १६० हून अधिक लोकांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. या फ्लॅश फ्लड येण्यामागील कारण ग्लेशियरचा मोठा भाग तुटून खाली कोसळणे असल्याचे सांगितले जात आहे. 

प्राथमिक वैज्ञानिक विश्लेषणातून या नैसर्गिक आपत्तीमागचं वेगळंच कारण समोर आलं आहे. तिबेट-नेपाळच्या सीमाभागात भूकंप होऊन हिमस्खलन झालं. बर्फाचे मोठे खडक नेपाळच्या लेंडे खोला नदीत आदळून पूर आला. ही भोटे कोशी नदीची उपनदी असल्याने या नदीलाही पूर येऊन नेपाळमधील अनेक गावं, खेडी अक्षरश: उद्ध्वस्त झाली.

काठमांडूपासून सुमारे 40 मैल उत्तरेला असलेल्या हिमालयीन भागात ही घटना घडल्याचं प्राथमिक विश्लेषण सांगतंय. सॅटेलाइट प्रतिमांनुसार, सुमारे 2,000 फूट रुंदीचा बर्फाचा मोठा भाग सुमारे 17,000 फूट उंचीवरून तुटून जवळपास 4,000 फूट खाली घाटीत कोसळला. या प्रचंड वेगाने खाली आलेल्या बर्फामुळे मोठ्या प्रमाणात बर्फ, दगड आणि मातीचा मलबा तयार झाला. तज्ज्ञांच्या मते, या घटनेमुळे नदीच्या प्रवाहात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा मिसळला. काही प्राथमिक अहवालांनुसार, या मलब्यामुळे नदीचा मार्ग काही काळासाठी अडला आणि त्यानंतर तयार झालेला तात्पुरता जलसाठा अचानक फुटल्याने महापुराचा वेग आणखी वाढला असण्याची शक्यता आहे.

घटना घडल्यानंतर परिसरात भूकंपासारखा सिस्मिक सिग्नल नोंदवला गेला होता. सुरुवातीला 4.4 तीव्रतेच्या भूकंपामुळे हिमनदीचा भाग तुटला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, अमेरिकेच्या USGSच्या डेटानुसार हा सिग्नल प्रत्यक्ष भूकंपाऐवजी प्रचंड भूस्खलनामुळे निर्माण झालेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूकंप हा या आपत्तीचा मूळ कारण होता का, याचा तपास अद्याप सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group