देशातील हवामानात मोठा बदल होत असून आता हवामान खात्याचा उद्या 26 ऑगस्टसाठीचा अंदाज आला आहे. आयएमडीने घाबरवणारा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या भाकितानुसार, दिल्लीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत हवामानात मोठा बदल होणार आहे. उद्या पावसासोबतच प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे सर्वांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 23 राज्यातील लोकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागू शकतो. एवढेच नव्हे तर उद्या ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. पुढचे 17 तास धोक्याचे असल्याने नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन आयएमडीने केलं आहे. तसेच महाराष्ट्रासाठीही अलर्ट देण्यात आला आहे.
मुसळधार पावसासोबतच वेगाने वारे वाहणार असल्याने झाडांच्या फांद्या तुटून कुणाच्याही अंगावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसात झाडाखाली उभे राहू नका. जर बाहेर जाण्याचा प्लानिंग असेल तर एकदा हवामानाचा अंदाज घेऊनच घराच्या बाहेर पडा. कारण ड्रायव्हिंग करताना पुरेशी दृश्यमानता मिळेलच याची काही शाश्वती नसणार आहे. मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वेगाने वारे वाहणार असल्याने अशा परिस्थितीत समुद्रात मासेमारीसाठी जाणं धोक्याचं ठरणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना नुकसान होण्याची शक्यता आहे
23 राज्यांना अलर्ट
आयएमडीने 26 ऑगस्ट रोजी संपूर्ण 23 राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, मेघालय, दक्षिण कर्नाटक, अंतर्गत तटीय भाग, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, तामिळनाडू, तेलंगाणा, पद्दुचेरी आदी राज्यांना आयएमडीने अलर्ट जारी केला आहे.