राज्यातील घडामोडी वेगाने सुरु असून राजसरकारकडून अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले जात आहते. दरम्यान,आता आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आले आहेत.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातील ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकास कामांना गती देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने महत्त्वाचे पाऊल उचलले. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी. श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखड्यातील ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकास कामांना गती लाभणार. पंढरपुरचे धार्मिक, पारंपरिक महत्व, वारकरी भाविकांची संख्या, स्थानिक परिस्थिती व प्रकल्पाची तातडीची गरज विचारात घेऊन विशेष पुनर्वसन धोरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार प्रकल्प बांधितासाठी विशेष पॅकेज देण्याच्या सुचनेला अनुसरून, जिल्हा प्रशासनाकडून धोरण सादर.