''या'' प्रसिद्ध संगीतकाराच्या मुलाचा रात्री ३ वाजता भीषण अपघात
''या'' प्रसिद्ध संगीतकाराच्या मुलाचा रात्री ३ वाजता भीषण अपघात
img
Nandini khandare More

 प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानचा मुलगा आणि गायक आणि संगीत निर्माता ए.आर. अमीन याचा चेन्नईमध्ये रोड एक्सिडेंट झाला. सुदैवाने या अपघातात अमीनला केवळ किरकोळ दुखापत झाली असून, रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या गिंडी परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. अमीन आपल्या पोर्श कारमधून जात होता. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता. यावेळी रॅपिडोची वॅगन-आर कार साइड रोडवरून मुख्य रस्त्यावर येत असताना तिची अमीनच्या कारला धडक झाली.

या घटनेत अमीन आणि त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली. दोघांनाही तातडीने कावेरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारानंतर अमीनला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. दुसरीकडे, वॅगन-आरमधील व्यक्तीलाही दुखापत झाली असून त्याला कलैग्नर सेंटेनरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group