हल्ली पती पत्नीच्या नात्यातअनेक भयावह आणि गंभीर घटनाउघडकी येत आहे. पतीने पत्नीचा किंवा पत्नीने पतीचा खून केल्या असल्याच्या अनेक घटना घाट आहेत. दरम्यान आत आशूचं एक हादरवणार बातमी समोर आली आहे.
ही घटना दिल्लीत घडली आहे. पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करत त्याची हत्या केली असल्याचं उघडकीस आलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या केली आणि पोलिसांसमोर बनाव रचला. याप्रकरणी आरोपी महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील रतिया मार्ग परिसरात सदर घटना घडली. मुन्ना लाल असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या बायकोचे नाव मंजू असे आहे. ९ ऑगस्ट रोजी आरोपी महिलेने आपल्या नवऱ्याला रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. मात्र त्याने त्याच्या जीवाला कोणतीही इजा झाली नसल्याचं लक्षात येताच महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर विजेचे शॉक दिले. यावरही आरोपींचं निर्दयी मन थांबलं नाही म्हणून त्यांनी मुन्ना लालला लाकडी दांडक्याने जीव जाईपर्यंत मारहाण केली.
झोपेच्या गोळ्या, विजेचा शॉक आणि लाकडी दांडक्याच्या जबर मारहाणीत मुन्ना लाल रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. १० ऑगस्टची पहाट उजाडली आणि तिकडे मंजूने चेहऱ्यावरचा क्रूरतेचा मुखवटा उतरवून रडायला सुरुवात केली. मंजुचा आवाज ऐकून शेजारचे आहेत त्या अवस्थेत मुन्ना लालच्या घरी पोहोचले. घटनास्थळी जाताच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात मुन्ना लाल निपचित पडलेला दिसला. शेजाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली.
एकीकडे मुन्नाच्या मृत्यूचे खरं कारण शोधण्यासाठी डॉक्टर शवविच्छेदन अहवाल तयार करत होते, तर दुसरीकडे पोलीस मंजूच्या घराच्या दारापाशी येऊन उभे राहिले होते. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी घराची झडती घेऊन महत्वाचे पुरावे जमा केले. त्यानंतर पुढील तपासासाठी मंजूची चौकशी करण्यात आली. या चौकशीत मंजूने टेरेसवरून काही चोर घरात घुसले. त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. या चोरीच्या प्रयत्नात मुन्ना आणि चोरांमध्ये झटपट झाली आणि त्याची हत्या झाल्याचे म्हटले. मंजूच्या या जबाबावरून पोलिसांना संशय आला. त्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले यामध्ये पहाटे १.४५ वाजता एक मुखवटा घातलेली व्यक्ती घरात शिरताना आणि ३.१५ वाजता बाहेर पडताना दिसली.
पोलिसांचा संशय आणखी बळावल्याने त्यांनी पोर्स्टमार्टम रिपोर्टचा अभ्यास केला. या शवविच्छेदन अहवालात पोलिसांसमोर धक्कादायक सत्य समोर आलं. मुन्ना च्या प्रायव्हेट पार्टवर झालेली इजा आणि त्याच्या अंगावर जोरदार हल्ला केल्याचे वळ यामुळे पोलिसांना संशयाचा धागा मंजू पर्यंत घेऊन गेला. यानंतर मंजुची चौकशी केल्यावर मंजू घडाघडा बोलू लागली. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून हा कट रचल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं. आरोपी मंजूच्या कबुली जबाबावरून तिच्या बॉयफ्रेंडसह इतर साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.