आजकाल रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. आता अशाच एका अपघाताची बातमी समोर आली असून धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात कारमध्ये असलेल्या एअरबॅग्जन उघडल्याने एका जवानासह दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. हा भीषण अपघात राजस्थानमध्ये घडला असल्याची माहिती आहे.
राजस्थानातील वीरांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झुंझुनू जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी बातमी आली आहे. येथे आपल्या गावी सुट्टीवर आलेल्या एका जवानाचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. याशिवाय, कारमध्ये असलेल्या जवानाच्या मित्राचाही जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे.
झाडावर जाऊन आदळल्यानंतर कार तीन ते चार वेळा उलटली - झुंझुनू-चिडावा मार्गावरील बगड गावाजवळ मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री १:३० वाडण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्यावर अचानक आलेल्या मोकाट जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची भरधाव एसयूव्ही (SUV) अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली आणि तीन ते चार वेळा उलटली. ही धडक एवढी भीषण होती की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जेसीबी तसेच क्रेनच्या साहाय्याने कारचे दरवाजे तोडून मृत्यू आणि जखमींना बाहेर काढले.