खासगी ट्रॅव्हलमध्ये महिला प्रवाशाचा दोन वेळा विनयभंग ! तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
खासगी ट्रॅव्हलमध्ये महिला प्रवाशाचा दोन वेळा विनयभंग ! तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
img
Nandini khandare More

राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना वारंवार महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना वात असून आता महिला कुठेही सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी जाणवलं आहे. दरम्यान आता चक्क खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा वेळा विनयभंग केला असल्याची घटना  उघडकीस आली आहे. 

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असं आपण नेहमी म्हणतो, त्यामुळेच बसच्या प्रवासाला सर्वसामान्य नागरिक प्राधान्य देतात. विशेषत: महिलांकडूनही लाल परीला प्राधान्य असते. मात्र, अनकेदा बसची कमतरता आणि तिकीटाच्या बुकींगमुळे खासगी ट्रॅव्हल्सचा, खासगी बसचा (Bus) पर्याय निवडावा लागतो. मात्र, खासगी बसमधील प्रवास कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न आहे. त्यातच, महिलांसाठी खासगी बसचा प्रवास किती सुरक्षित हा खरा प्रश्न आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खासगी बसमध्ये (Raigad) एका महिलेचा दोनवेळा विनयभंग झाल्याने संताप व्यक्त होत आहे. स्वत: आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करुन सरकारला प्रश्न केला आहे. 

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसमधील महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान बसच्या क्लिनरने दोन वेळा महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप या महिलेनं केलाय. या प्रवासादरम्यान संगमेश्वर इथं पहिल्यांदा झोपेतून उठवण्याच्या बहाण्याने आणि नंतर पोलादपूर इथं विनयभंग केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिलेने रात्री तात्काळ पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. त्यानंतर, रायगडमधील कोलाड पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी प्रकरण संगमेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे. दरम्यान पीडित महिला ही संभाजीनगर परिसरातील असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. सरकारने लाडकी बहीण नावापुरती न म्हणता या महिलेच्या पाठीशी उभं रहावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group