ग्राहकांनो लक्ष द्या ! ऑगस्टमध्ये  बँकांना  १४ दिवस सुट्ट्या ; कोण-कोणत्या दिवशी बँक बंद असतील तपासा ?
ग्राहकांनो लक्ष द्या ! ऑगस्टमध्ये बँकांना १४ दिवस सुट्ट्या ; कोण-कोणत्या दिवशी बँक बंद असतील तपासा ?
img
Nandini khandare More
बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढचा महिन्यात तुमचे काही बँकेचे काम असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यतं महत्वाची आहे कारण ऑगस्ट पाहण्यात तब्बल १४ दिवस बँक बंद असणार आहे . म्हणून तुम्ही आधी या तारखा तपासा.   ऑगस्टमध्ये देशभरातील बँक १४ दिवस बंद असल्या  तरीही मात्र, ऑनलाइन बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहतील.

ऑगस्ट महिन्यात बँक कधी बंद राहतील? 

२ ऑगस्ट (रविवार) २ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील. ही साप्ताहिक सुट्टी आहे. 
४ ऑगस्ट (मंगळवार) 'केर पूजा'निमित्त आगरतळा (त्रिपुरा) येथील बँका ४ ऑगस्ट रोजी बंद राहतील. इतर राज्यांमधील बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहतील. 

८ ऑगस्ट (शनिवार) महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने ८ ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. यासह गंगटोक (सिक्कीम) येथे 'टेंडोंग ल्हो रुम फाट' निमित्त सुट्टी असणार आहे. 

९ ऑगस्ट (रविवार) रविवार असल्याने ९ ऑगस्ट रोजी देशभरातील बँका बंद राहतील.

१३ ऑगस्ट (गुरुवार) 'पॅट्रियट्स डे' (देशभक्त दिन) निमित्त इम्फाळ (मणिपूर) येथील बँका १३ ऑगस्ट रोजी बंद राहतील.

 १५ ऑगस्ट (शनिवार) स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. 

१६ ऑगस्ट (रविवार) रविवार असल्याने देशभरातील सर्व बँका राहतील बंद. 

१९ ऑगस्ट (बुधवार) महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांच्या जयंतीनिमित्त १९ ऑगस्ट रोजी आगरतळा (त्रिपुरा) येथील बँका बंद राहतील. 

२२ ऑगस्ट (शनिवार) चौथा शनिवार असल्याने २२ ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील.

 २३ ऑगस्ट (रविवार) रविवारी असलेल्या साप्ताहिक सुट्टीमुळे २३ ऑगस्ट रोजी देशभरातील बँका बंद राहतील. 

२५ ऑगस्ट कोच्ची आणि तिरुवनंतपुरम केरळ तसेच आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे मिलाद-उन- नबी (ईद-ए-मिलाद) आणि प्रथम ओणम च्या सणामुळे बँक बंद असतील. 

२६ ऑगस्ट रोजी कुठे-कुठे असेन सुट्टी बेलापूर, मुंबई आणि नागपूर (महाराष्ट्र) येथे बँका बंद राहतील. बेंगळुरू (कर्नाटक), भोपाळ (मध्य प्रदेश); चेन्नई (तामिळनाडू), डेहराडून (उत्तराखंड), हैदराबाद (तेलंगणा), इंफाळ (मणिपूर), जम्मू आणि श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर), कानपूर आणि लखनौ (उत्तर प्रदेश), कोची आणि तिरुवनंतपुरम (केरळ), नवी दिल्लीसह पाटणा (बिहार), रायपूर (छत्तीसगड), आणि रांची (झारखंड) ईद-ए-मिलाद (बारावफत), तिरुवोनम आणि इतर स्थानिक सणांमुळे येथील बँकांना सुट्टी असेल.

२८ ऑगस्ट रोजी अहमदाबाद (गुजरात), भोपाळ (मध्य प्रदेश), डेहराडून (उत्तराखंड), गंगटोक (सिक्कीम), जयपूर (राजस्थान), जम्मू आणि श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर), कानपूर आणि लखनौ (उत्तर प्रदेश), कोची आणि तिरुअनंतपुरम (केरळ) आणि उत्तराखंड (केरळ) आणि उत्तर प्रदेशमध्ये बँका बंद राहतील. नारायण गुरु जयंती, अयंकाली जयंती आणि पांग-लबसोलच्या सणामुळे बँक बंद असतील.

 ३० ऑगस्ट रविवार असल्यामुळे ३० ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. सुट्टी असल्यास बँकेची कामे कसे होतील? बँकेच्या शाखा सुट्ट्यांमुळे बंद असल्यानं युपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बॅकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, ऑनलाईन फंड ट्रान्सफर आणि बिल पेमेंट सारख्या डिजिटल सर्व्हिस नेहमीप्रमाणे चालू असतील. त्यामुळे, ऑनलाइन व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

इतर बातम्या
Join Whatsapp Group