''या'' धरणातून तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु; 30 दरवाजे उघडले
''या'' धरणातून तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु; 30 दरवाजे उघडले
img
Nandini khandare More

सध्या राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक जिल्हयात आता पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आता जळगावमध्ये जोरदार पाऊस  सुरु असून जळगावमध्ये मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे तब्बल 30 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

धरणातून तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही काळापासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये विशेष दक्षता घेतली जात आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतर्क आहेत. दरम्यान, धरणाचे दरवाजे उघडल्याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group