सीजेपीच्या नव्या पोस्टने मोठं वादळ,  पोस्ट करत दिला थेट इशारा ; नेमकं काय आहे ?
सीजेपीच्या नव्या पोस्टने मोठं वादळ, पोस्ट करत दिला थेट इशारा ; नेमकं काय आहे ?
img
Nandini khandare More

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन संपले आहे. परंतु आता कॉकरोच जनता पार्टीने पुन्हा एकदा सरकारला मोठा इशारा दिला. आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यांना अटक केली जात आहे. सीजेपीचे प्रवक्ते साैरभ दास याने मोठे भाष्य केले. वेगवेगळ्या राज्यातून आंदोलकांना ताब्यात घेणे, त्यांना अटक करणे याबाबत माहिती पुढे येत आहे.

जर उद्यापर्यंत सर्व एफआयआर वापस घेतले नाही तर पुढे काय करायचे याचा विचार केला जाईल. सीजेपीने दावा केला की, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये एसन्सीकडून आंदोलकांना टार्गेट केले जात असल्याची माहिती मिळतंय. सीजेपीच्या इशाऱ्यानंतर तात्काळ सरकारने आंदोलकांवरील एफआयआर वापस घेतले जातील आणि कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे म्हटले. मात्र, येणारे रिपोर्ट नक्कीच चिंताजनक होते.

जर आंदोलकांवरील कारवाई सुरूच राहिली तर सीजेपी पुढचा विचार करू शकते. हेच नाही तर कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ ज्यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीला पोहोचले होते, त्यावेळीच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय झाला होता. पहिल्याच बैठकीत सरकारने त्यांची मागणी ही मान्य केली होती. मात्र, तरीही आंदोलकांवर कारवाई होत असल्याचा आरोप सीजेपीचा आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group