उद्या महाराष्ट्रात ड्राय डे! आषाढी एकादशी निमित्त  दारूची  दुकाने आणि बार राहणार बंद
उद्या महाराष्ट्रात ड्राय डे! आषाढी एकादशी निमित्त दारूची दुकाने आणि बार राहणार बंद
img
Nandini khandare More
महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक सणांपैकी एक असलेला सन म्हणजे आषाढी एकादशी. शनिवारी, म्हणजेच उद्या २५ जुलै रोजी आषाढीचा उत्सव साजरा होणार असून  महाराष्ट्रात आषाढी एकादशीनिमित्त ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील दारूची सर्व दुकाने, बार, पब दिवसभर बंद राहणार आहेत. 

महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक सणांपैकी एक असलेल्या आषाढी एकादशीला लाखो भाविक भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. राज्यभरात मंदिरांमध्ये विशेष पूजा, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धार्मिक वातावरणाला गालबोट लागू नये यासाठी राज्य सरकारकडून ड्राय डे लागू केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group