देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना दर दिवशी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना उघडीस येत आहेत. दरम्यान आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीवर बॉयफ्रेंडसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चित्रकूट येथील जंगलात घडली. बुधवारी तरुणी आपल्या मित्रसोबत जंगलात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तीन जणांनी त्यांना अडवले. वन अधिकारी असल्याचे सांगत तिन्ही आरोपींनी या दोघांना जंगालात का आला असे विचारले. त्यानंतर त्यांनी या तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी तरुणीच्या मित्रासमोरच हे भयंकर कृत्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बहिल पूर्वा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवंगणा येथील विमानतळाजवळ घडली. २० वर्षीय पीडितेने तक्रार देताना सांगितले की, बुधवारी सायंकाळी ४ वाजता ती आणि तिचा १७ वर्षीय मित्र दुचाकीवरून देवंगणा खोऱ्याच्या दिशेने गेले होते. खोऱ्याच्या वळणावर बाईक पार्क करून ते विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरावर गेले.
ते दोघे एका खडकावर बसून बोलत होतो. तेव्हा ३ अनोळखी तरुण तिथे आले. या तरुणांनी स्वतःची ओळख वन विभागाचे कर्मचारी म्हणून करून दिली आणि त्यांनी चौकशी सुरू केली. थोड्याच वेळात दोघांनी माझ्या मित्राला पकडले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन ते तिन्ही तरुण पळून गेले.
या घटनेनंतर पीडित तरुणीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ४ पथकं तयार केली आहेत. पोलिस सीसीटीव्ही फूटेज देखील तपासत आहेत.