सध्या देशभरात नीट पेपर फुटीवरुन मोठा गदारोळ सुरु आहे. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच मोठं आंदोलन सुरु आहे. यावरून देशभरातून विविध मतं मांडण्यात येत आहेत तर अनेक चर्चाना देखील उधाण आलं आहे. राजकीय पक्ष मोठमोठे नेते तसेच सेलिब्रिटी सर्वच जण यावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत.
दरम्यान आता या संदर्भात तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या TVK पक्षाने एक वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांचा टीव्हीके पक्ष फक्त नीट परीक्षेतील अनियमितते विरोधातच नाहीय, तर मेडीकल एन्ट्रन्स टेस्ट नीट परीक्षा रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे. वैद्यकीय परीक्षेसंदर्भात सर्वाधिकार राज्यांना द्यावेत अशी TVK ची मागणी आहे. टीव्हीकेची या मुद्यावर एकदम ठाम भूमिका आहे. आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही, आम्ही ठाम आहोत. राष्ट्रीय स्तरावरील एन्ट्रन्स टेस्ट रद्द करावी. यावर उपाय म्हणून, शिक्षण हा विषय संविधानातील समवर्ती सूचीतून काढून राज्य सूचीत समाविष्ट करावा अशी TVK ची मागणी आहे.
टीव्हीकेने आपल्या स्टेटमेंटमध्ये नाव न घेता मुख्य विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकला लक्ष्य केलं. मत मिळवण्यासाठी फसवणुकीचं खोट राजकारण करणार नाही अशी विजय यांची भूमिका आहे. 2021 विधानसभा निवडणुकीआधी द्रमुकने सत्तेवर आल्यास आपण नीट परीक्षा रद्द करु असं निवडणूक काळात आश्वासन दिलेलं. यामध्ये शिक्षणाचा सर्वाधिकार राज्यांना मिळू शकतो. कायमस्वरुपी आणि अंतरिम तोडगा म्हणून हा आमचा दृष्टीकोन आहे. आमचे नेते विजय यांनी आधीच हा मुद्दा मांडला आहे असं टीव्हीकेने म्हटलय.