भगवान जगन्नाथ रथ यात्रेला गालबोट ! रथयात्रेमध्ये चेंगराचेंगरी, 200 जण जखमी, एकाचा मृत्यू
भगवान जगन्नाथ रथ यात्रेला गालबोट ! रथयात्रेमध्ये चेंगराचेंगरी, 200 जण जखमी, एकाचा मृत्यू
img
Nandini khandare More
सध्या अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. वारी दरम्यान ट्रकने  चिरडून  ४ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. 

मोठी बातमी समोर येत आहे, पुरी रथयात्रेमध्ये गरुवारी मोठी दुर्घटना घडली आहे. यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 200 जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ग्रँड रोडवर असलेल्या मार्केट चौक आणि मिरची कोर्ट चौकादरम्यान या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं जमले होते.

याच दरम्यान ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना भगवना जगन्नाथ यांच्या ‘पहंडी’ विधीदरम्यान घडली आहे. भाविक प्रचंड संख्येनं या ठिकाणी जमा झाले होते. याचवेळी गोंधळ झाल्याने ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत 200 जण जखमी झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group