कॉलेज रोड येथील स्पा सेंटरमधील कुंटणखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त
कॉलेज रोड येथील स्पा सेंटरमधील कुंटणखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- 
कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीत असलेल्या डेजी वेलनेस स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून तीन परप्रांतीय महिलांची सुटका करून स्पा मालक महिला, मॅनेजर व तेथे आढळून आलेल्या दोन ग्राहकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रचीती गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की दि. 15 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीत असलेल्या डेजी वेलनेस स्पा सेंटरच्या मालक आरोपी कविता पवन कोरडे (वय 43, रा. रुक्मिणी सोसायटी, मखमलाबाद रोड, पंचवटी), मॅनेजर अर्चना संजय मोरे (वय 32, रा. आनंदछाया बस स्टॉपजवळ, सातपूर) या स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाणा चालवत होत्या तेव्हा दोन ग्राहक देखील होते.

तीनही मालक व मॅनेजर यांनी संगनमत करून परप्रांतीय तीन महिलांकडून तेथे येणार्‍या ग्राहकांकडून पैसे आकारून कुंटणखाना चालवीत असताना प्रत्यक्षरीत्या मिळून आल्या. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी कविता कोरडे, अर्चना मोरे यांच्यासह आणखी दोन जणांविरुद्ध स्त्रियांचा अनैतिक प्रतिबंध अधिनियम 1956 च्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवाद करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group