राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. सूरज साखरे असं या कार्यकर्त्यांचं नावं आहे, सूरज साखरे हे या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. खासगी सावकारकीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप कार्यकर्ते असलेले सुरज साखरे यांच्यावर दोघांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूरच्या नवी वाशी नाका परिसरात ही थरारक घटना घडली आहे. दरम्यान त्यानंतर सुरज साखरे यांना तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.