भीषण अपघात ! उभ्या डंपरला कारची धडक;  ४ जणांचा मृत्यू ,२ गंभीर जखमी
भीषण अपघात ! उभ्या डंपरला कारची धडक; ४ जणांचा मृत्यू ,२ गंभीर जखमी
img
Nandini khandare More

राज्यात सध्या  अपघातांचे प्रमाण वाढले असून दरदिवशी अतिशय गंभीर अशा अपघाताच्या घटना घडत आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना आज पहाटे घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथील शांतीनगर परिसरातील रेस्ट हाऊसजवळ गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या क्रेटा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज (बुधवारी १५ जुलै २०२६) सकाळी झाला. 

 मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटा कार  गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. आज, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लांजा येथील शांतीनगर परिसरात पोहोचली असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरवरपाठीमागून धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा दोन जणांची प्रकृती चिंताजनक या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबवण्यात आले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group