आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तेल कंपन्यांकडून थेट मोठा दिलासा मिळाला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत असताना भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या भावाता कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. कच्चे तेल 76 डॉलर प्रति बॅरल झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची वाढ भारतात करण्यात आली नाही.
केंद्र सरकारकडून नागरिकांना हे मोठे गिफ्टच म्हणावे लागेल. एक बॅरल कच्च्या तेलात जर 10 डॉलर वाढतात त्यावेळी भारतीय ऑयल मार्केटिंग कंपन्यांना 6 रूपये प्रति लीटर नुकसान सहन करावे लागते. तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, आज दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.12 रुपये आहे.मुंबईत 111.21 रुपये आहे. कोलकातामध्ये 113.51 रुपये आणि चेन्नईमध्ये 107.77 रुपये इतका आहे.
दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 95.20 रुपये आहे. कोलकातामध्ये हा दर प्रति लिटर 99.02 रुपये, मुंबईत 97.83 रुपये आणि चेन्नईमध्ये 99.55 रुपये इतका आहे. इराणशी संबंधित संघर्ष सुरू झाल्यापासून या किमतीत जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.तरीही भारतीय तेल कंपन्यांनी कोणत्याही प्रकारची कच्च्या तेलाच्या भावात वाढ केली नाही.