मोठी बातमी ! महिला डॉक्टरला मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी
मोठी बातमी ! महिला डॉक्टरला मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी
img
Nandini khandare More

कल्याण-डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे (शिंदे गटाचा ) नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. हे प्रकरण  चांगलंच तापलं असून आता या प्रकरणात  आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

डोंबिवलीतील महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रमेश म्हात्रे यांना आता 4 दिवस म्हणजे 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली, यावेळी रमेश म्हात्रे यांच्यासह इतर तीन आरोपी हजर होते. या तिघांनाही 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डोंबिवली महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी कल्याण सत्र न्यायालयात सुनावनी पार पडली. आरोपी रमेश म्हात्रेंसह इतर तीन आरोपींच्या उपस्थितीत कल्याण न्यायालयातील कोर्ट हॉल 6 मध्ये न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग सरन्यायाधीश श्रीमती के एस कातकडे यांच्या दालनात युक्तिवाद पार पडला. आरोपी रमेश म्हात्रे यांचे वकील आनंद पथकी आणि सरकारी वकील आनंद आढसकर यांच्यात युक्तिवाद झाला दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकूण घेतल्यानंतर के एस कातकडे यांनी म्हात्रे यांच्यासह इतर 3 आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group