नाशिकवर घोंगावणारं पावसाचं संकट टळलं ! जिल्हा प्रशासनाची माहिती
नाशिकवर घोंगावणारं पावसाचं संकट टळलं ! जिल्हा प्रशासनाची माहिती
img
Nandini khandare More

 नाशिककरांसाठी दिलदायक बातमी आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर  परिसरावर घोंगावणारे ढगफुटीसदृशपावसाचे मोठे संकट तूर्तास टळले आहे. नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचा हाय अलर्ट (High alert) जारी करण्यात आला होता. मंगळवारी पहाटेपर्यंत नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. मंगळवारी सकाळी पावसाने नाशिक शहर परिसरात काही काळ विश्रांती घेतली असली तरी त्र्यंबकेश्वर,आणि इगतपुरी या परिसरात सध्या प्रचंड पाऊस पडत आहे

हवामान विभागाने पालघरमध्ये मोठ्याप्रमाणावर पावसाला कारणीभूत असणारा भोवरा मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, आता भोवरा इतर दिशेने वळल्यामुळे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळण्याची शक्यता आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याच्या प्रवाहामुळे सोमवारी पालघरमध्ये तब्बल ४५० मिलिमीटर इतका मुसळधार पाऊस पडला होता. हाच भोवरा पुढे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पट्ट्यात सरकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

मात्र, वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हे धोकादायक ढग आता नाशिक सोडून अहिल्यानगर (अहमदनगर) आणि गुजरातच्या सुरत शहराच्या दिशेने पुढे सरकले आहेत. त्यामुळे नाशिकवरील थेट ढगफुटीचा धोका आता टळला आहे. दरम्यान, नाशिक, इगतपुरी त्रंबकेश्वर भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group