कच्च्या तेलाच्या किंमती कमी जास्त होत असून याचा पेट्रोल डिझेलच्या दरात होत आहे. दरम्यान आज पुन्हा आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली की नाही ते पाहा.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 91 डॉलरवर पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज, 18 ऑगस्ट 2026 रोजी, देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) ऑगस्ट महिन्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.
पेट्रोल निर्यातीवरील शुल्क 14 ऑगस्ट 2026 पासून कमी करून शून्य करण्यात आले. यापूर्वी हे 3.5 रुपये प्रति लिटर होते. डिझेलच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कचा दर आता 25.5 रुपये प्रति लिटरवरून घसरला. तो आता 24 रुपये प्रति लिटर झाला आहे. विमान इंधनच्या निर्यातीवरील एसएईडी पूर्वीच्या 22 रुपये प्रति लिटर होता. आता तुलनेत कमी करून 19.5 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. सरकार देशांतर्गत पुरवठा कायम ठेवण्यासाठी वेळोवेळी हा टॅक्स लावत असतात.