नाशिकमधील सुप्रसिद्ध किल्ला हरिहर गड हा थरारक गिरिदुर्ग आहे. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे पर्यटनासाठी जात असतात. मात्र आता गडावर जाण्याआधी ही बातमी वाचणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. कारण आता हरिहर गडावर प्रशासनाने पर्यटकांना पुन्हा एकदा प्रवेशबंदी लागू केली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर संपत देवकर ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात गडाच्या खड्या पायऱ्या अत्यंत निसरड्या होतात. दाट धुके, अचानक बदलणारे हवामान आणि जोरदार पावसामुळे अपघाताचा मोठा धोका असतो. तसेच क्षमतापेक्षा जास्त गर्दी होणे, पर्यटक वनक्षेत्रात हरवणे आणि तरुणांकडून होणारी हुल्लडबाजी वा धोकादायक सेल्फीचे प्रकार यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे हरिहर गडावर पुन्हा एकदा पर्यटकांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. त्र्यंबक प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने बुधवारी (दि. १९) अधिकृत आदेश जारी केला आहे. पुढील आदेश येईपर्यंत गड पर्यटनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत गड पर्यटनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.