नाशिकमध्ये
नाशिकमध्ये "या" ३ हॉटेल्स वर FDA ची कारवाई; परवाने केले निलंबित
img
Nandini khandare More
 नाशिक :- राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन, नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये "सेफ फुड, सेफ महाराष्ट्र" या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे, सह आयुक्त मंगेश माने, ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या काही हॉटेल मध्ये कारवाई करण्यात आली.

प्रशासनास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. १२/०८/२०२६ रोजी शहरात विविध आस्थापनांची तपासणी केली असता नाशिक शहारातील 3 हॉटेल आस्थापनांमध्ये स्वच्छता व अन्न सुरक्षा विषयक त्रुटी आढळुन आल्यामुळे अन्न सुरक्षा कायदा २००६ चे परिशिष्ट ४ व इतर तरतुदींचे उल्लंघन झाल्यामुळे मानवी आरोग्य हिताच्या दृष्टीने 3 हॉटेल आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. मे. हॉटेल वास्को नाशिक रोड, नाशिक या ठिकाणी अमित रासकर, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तपासणी केली असता स्वच्छता व अन्न सुरक्षा विषयक त्रुटी आढळुन आल्यामुळे व परिशिष्ट ४ चे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनातर्फे सदर आस्थापनेचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.

मे. सेलेब्रिटा रेस्टॉरंट अँड बँक्वेटस, नाशिक रोड, नाशिक या ठिकाणी अमित रासकर, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तपासणी केली असता स्वच्छता व अन्न सुरक्षा विषयक त्रुटी आढळुन आल्यामुळे व परिशिष्ट ४ चे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनातर्फे सदर आस्थापनेचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.मे. हॉटेल माउली, मुंबई आग्रा रोड, आडगाव, नाशिक या ठिकाणी संकेत येलमामे, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तपासणी केली असता स्वच्छता व अन्न सुरक्षा विषयक त्रुटी आढळुन आल्यामुळे व परिशिष्ट ४ चे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनातर्फे सदर आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणास सर्वोच्च प्राधान्य देत असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यवसायिकास कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नाशिक विभागात सुरू असलेली विशेष तपासणी मोहीम पुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असून अन्न व्यवसायिकांनी स्वच्छता, सुरक्षित अन्न उत्पादन, साठवणूक, हाताळणी व विक्री याबाबत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेब त्याअंतर्गत नियम व विनियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच नागरिकांनीही कोणत्याही अन्नपदार्थाबाबत दर्जा, स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक यांच्याकडे तक्रार नोंदवून सुरक्षित अन्न अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group