मोठी खळबळ ! नांदेडमध्ये माजी उपमुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात दाखल
मोठी खळबळ ! नांदेडमध्ये माजी उपमुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात दाखल
img
Nandini khandare More
नांदेडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेडमध्ये प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली असून त्यांनी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखी खाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

नांदेडच्या माता साहिब कौर भागातील गुरुद्वारात पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल आले होते. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था भेदत एका निहंगने धारदार शस्राने यांच्यावर कृपाणने हल्ला केला. या प्रकरणात घटनास्थळावरुन पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यातही घेतले आहे. नांदेडचे कलेक्टर राहुल कर्डिले यांनी सांगितले की सुखबीर सिंह बादल एका पर्सनल व्हिजिटसाठी नांदेड येथील गुरुद्वारात आले होते. त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले होते. या दरम्यान अचानक एका व्यक्तीने गुरुद्वारा परिसरात घुसून त्यांच्यावर अचानक धारदार शस्राने हल्ला केला. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे. 

या प्रकरणात पोलिसांना देखील जखमा झाल्या आहेत.अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेड येथे हल्ला, जवळच्या रुग्णालयात दाखल केले दरम्यान , हल्लेखोर कोण होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group