महिला सुरक्षेचा प्रश ऐरणीवर असून तरुण महिला असो किंवा वुद्ध, लहान चिमुकल्या असो किंवा अल्पवयीन मुली असो आजकाल सती जातच सुरक्षित नसल्याचं चित्र आहे. दरदिवशी अशा अनेक गंभीर आणि भयंकर घटना घडत असून आता हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.अशाच एका भयावह आणि संतापजनक अत्याचार आणि हत्याकांडाची बातमी उघडकीस आली आहे.
आसाममधील हलाकांडी जिल्ह्यात एका 16 वर्षांच्या मुलीवर तिच्या राहत्या घरात बलात्कार करून अत्यंत अमानुषपणे तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी तिचा चेहरा दगडाने ठेचला आणि डोक्यावर जड वस्तूने वार केले. तसेच या नराधमानी तिच्या गुप्तांगात रॉडसारखी वस्तु घातली. या खळबळजनक घटनेमुळे आसाममध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनसह पाच जणांना अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही हत्या लव्ह ट्रँगल'मधून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ही घटना शनिवारी रात्री आलाईचेरा भागात घडली. पीडित मुलगी तिच्या घरी मृत अवस्थेत आढळली. त्यावेळी तिचे कुटुंब शेजारी चाललेल्या एका कार्यक्रमात गेले होते. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमिताभ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलासह तीन जणांना अटक करून सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर मनोज दास उर्फ राजदीप दास (23) आणि सिराज दास (18) या आणखी दोन आरोपीना अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक सिन्हा यांनी सांगितले की, आम्ही सोमवारी एका अल्पवयीनासह तीन जणांना अटक केली होती. बुधवारी सकाळी आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. आम्ही सोमवारी एका अल्पवयीनासह तीन जणांना अटक केली होती. बुधवारी सकाळी आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान असे समोर आले आहे की, पीडितेचे दोन आरोपींशी प्रेमसंबंध होते आणि हेच या हत्येमागचे मुख्य कारण असू शकते. आरोपींच्या दाव्यानुसार, मुलीचे एकाच वेळी दोघांशी अफेअर सुरू होते.
पीडितेच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, घरातले सर्व सदस्य जवळच राहणाऱ्या एका नातेवाईकाकडे कार्यक्रमासाठी गेले होते. पीडित मुलगीही तिथे गेली होती, परंतु तिचे चुलत भावाशी वाद झाल्यानंतर ती रात्री १०:३० वाजताच्या सुमारास एकटीच घरी निघून आली. आम्हाला वाटले की नंतर तिच्यासाठी जेवण घेऊन जाऊ. पण जेव्हा आम्ही तासाभराने घरी पोहोचलो, तेव्हा तिथे अत्यंत भयानक दृश्य होते. तिचा मृतदेह इतक्या अमानुषपणे छिन्नविच्छिन्न करण्यात आला होता की ओळखणेही कठीण झाले होते. कोणतीही व्यक्ती एका लहान मुलीसोबत इतकी क्रूर कशी वागू शकते? असा सवाल करत पीडितेच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीला ओळखत होते आणि घर कधी रिकामे असेल याची त्यांना पूर्ण कल्पना होती. आरोपींची नेमकी भूमिका आणि घटनेचा घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी पोलीस मोबाईल फोन्स आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी करत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्यात आली आहे.