तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. गोवा खंडपीठाच्या मुंबई उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निर्णय रद्द करत त्यांना दोषी ठरवले आहे. त्यानंतर आता त्यांना किती शिक्षा द्यायची, यावर पुढील सुनावणी होणार आहे.तब्बल दशकभर चर्चेत राहिलेल्या या प्रकरणाने पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधून घेतले असून, नेमकं हे प्रकरण काय आहे, न्यायालयाने कोणती निरीक्षणे नोंदवली आणि पुढे काय होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निर्णय रद्द करून तरुण तेजपाल याला दोषी ठरवलं. गोवा सरकारनं खालच्या न्यायालयाच्या निर्दोष मुक्ततेविरोधात दाखल केलेल्या अपीलावर हा निकाल देण्यात आलाय. २०१३ मध्ये गोव्यातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा तेजपालवर आरोप होता. या प्रकरणी गोवा पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून नोव्हेंबर २०१३ मध्ये तेजपाल याला अटक केली होती. त्यानंतर त्याला जुलै २०१४ मध्ये जामीन मिळाला. २०१७ मध्ये खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी मे २०२१ मध्ये तेजपाल याची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, आता उच्च न्यायालयाने तो निकाल रद्द करून त्याना दोषी ठरवलंय
तेहलका मासिकेच्या एका कनिष्ठ महिला सहकाऱ्याने तरुण तेजपाल याच्यावर नोव्हेंबर 2013 साली लैंगिक छळाचा आरोप केला होता. या पीडित महिलेने तेहलकाच्या तत्कालीन मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेजपालने पीडित महिलेला ईमेल पाठवून माफी मागितली होती. ही करिअरमधील लाजीरवाणी चूक होती, असे ईमेलमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर पीडित महिलेने विशाखा कायद्यांतर्गत लैंगिक छळविरोधी सेल स्थापन करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची निस्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी तेजपालने सहा महिन्यांसाठी संपादकाचा राजीनामा दिला होता. तर 22 नोव्हेंबर 2013 रोजी माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गोवा पोलिसांनी या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली होती.
तेजपालचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर 30 नोव्हेंबर 2013 रोजी अटक करण्यात आली. परंतु सुप्रीम कोर्टाने त्याला एका वर्षाच्या जामीन मंजूर केला होता. पुढे सप्टेंबर 2017 साली त्याच्यावर सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा जपण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्यात आली होती. पुढे या प्रकरणी सरकारी पक्षाचे 71 साक्षीदार आणि सीसीटीव्ही फुटेज , ईमेल्सच्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी केली. त्यानंतर सत्र न्यायालयाने 21 मे 2021 रोजी तेजपालला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्ते केले होते. तर हायकोर्टानेही हा निकाल रद्द केला होता.