सिद्धिविनायक मंदिरातून तब्बल ''इतक्या'' कोटींची चोरी ! राज ठाकरेंच्या वक्तव्याने खळबळ
सिद्धिविनायक मंदिरातून तब्बल ''इतक्या'' कोटींची चोरी ! राज ठाकरेंच्या वक्तव्याने खळबळ
img
Nandini khandare More
 राजकारणातील घडामोडींना वेग आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात खळबळजनक आरोप केला.
प्रसिद्ध मंदिरातून कथित दान पेटीतील देणगी चोरीच्या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सिद्धिविनायक मंदिरातून तब्बल 18 कोटींची चोरी झाल्याचा आरोप ठाकरेंनी एका पत्राच्या आधारे केला आहे.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातून हा आरोप केला आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्याने आता राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. 

 राज ठाकरे म्हणाले, ‘एक पत्र आहे. प्रति एकनाथ शिंदे… विषय सिद्धीविनायक मंदिर न्यास मंदिरातील दानपेटीतील चोरीबाबत. खरंतर आपण मंदिरात श्रद्धेने जातो. दान टाकतो. धर्मासाठी टाकतो. तिथेच कर्मचारी चोरी करताना पकडले आहे. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी रकमेची मोजदाद ५० लाखांच्या आत होती. कर्मचारी पकडल्यानंतर आठवड्याची दान पेटीची रक्कम दीड कोटी झाली आहे. याचाच अर्थ ही रक्कम जमा होणारी रक्कम लंपास होत होती. दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांचे नुकसान होत होते. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहे. याची चौकशी करा. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावा. विश्वस्त मंडळ. राहुल लोंढे, मीना कांबळी, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे यांचं हे पत्र आहे’.

‘१८ कोटी रुपये दर वर्षी सिद्धीविनायक मंदिरातून चोरी होत आहे. आपण दानपेटीत टाकतो. ही माणसं चोरी लुटत आहे. हेच तरुण परीक्षावेळी पायऱ्या झिजवतात. देवाकडे जातात. तिथेच चोरी होते. तिथलेच विश्वस्त चोरी करतात. हा आमचा धर्म. सरकारवर विश्वास ठेवता येत नाही. म्हणून मंदिरात जावं तर मंदिरातच चोऱ्या होतात. होईल काय रस्त्यावरच लोक येतील. आपण देशाचा विचार केला पाहिजे. राजकारण बाजूला ठेवा. निवडणुका येतील तेव्हा वेगळा विचार करू. आज का झालं. उद्रेक का झाला. या गोष्टी समजायला नको. याला अनेक पापुद्रे आहेत. ही गोष्ट सरकारने समजून घेतली पाहिजे. तरुणांच्या आकांक्षा समजून घेतल्या पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group