शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार ? बड्या नेत्याने केला ''हा'' मोठा दावा
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार ? बड्या नेत्याने केला ''हा'' मोठा दावा
img
Nandini khandare More
नीट परीक्षेवरून देशात मोठा गदारोळ निर्माण झाला होता दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांची केंद्रीय शिक्षण मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याचा दरम्यान आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत मोठा दावा केला आहे. 

सोमवारी म्हणजेच आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी मोठा निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी नंदन निलकेणी आणि देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला.

संजय राऊत म्हणाले, “1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी अर्थखात्याची धुरा मनमोहन सिंग यांच्याकडे देऊन आर्थिक क्रांती घडवली. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी शिक्षणपद्धती सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाहेरची व्यक्ती या पदावर बसवावी. नंदन निलकेणी यांना शिक्षणमंत्री पद द्यावे. काही ज्या देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात, ते फडणवीस योग्य व्यक्ती आहेत. आता त्यांनाच देशाचं शिक्षणमंत्री केलं जाईल.”यावेळी त्यांनी, “देवेंद्र फडणवीस हे मी महाराष्ट्रातच राहणार, असे सांगत असले तरी त्यांनी कुठे राहायचं, ही गोष्ट त्यांच्या हातात नाही,” असेही म्हटले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group