धक्कादायक ! नेपाळी महिलेवर सामूहिक बलात्कारा;  महिलेच्या हातात  २०० रुपये ठेवून आरोपींनी काढला पळ
धक्कादायक ! नेपाळी महिलेवर सामूहिक बलात्कारा; महिलेच्या हातात २०० रुपये ठेवून आरोपींनी काढला पळ
img
Nandini khandare More


देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. दरम्यान आता अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 

नेपाळी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. औरंगाबाद जिल्हा मुख्यालयात पीडित महिला नवऱ्यासोबत राहते. ही घटना मंगळवारी इरिगेशन कॉलनीजवळील एका जीर्ण इमारतीमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तर एका १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं. राकेश कुमार, अभिषेक कुमार अशी आरोपींची नावं आहेत. एक आरोपी अल्पवयीन असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी पीडत महिलेची वैद्यकीय तपासणी केली.

पीडित महिला ही नेपाळची रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी तिने दुसऱ्यांदा लग्न केले होते. तिच्या पहिल्या नवऱ्याचे निधन झाले होते. तिला पहिल्या नवऱ्यापासून ४ मुलं आहेत. तिचा नवरा बाजारात चहा विक्री करतो आणि मुलांची काळजी घेतो. २१ जुलै रोजी सांयकाळी ५ वाजता पीडित महिला घराबाहेर उभी होती. त्यावेळी त्याच परिसरात राहणारा एक अल्पवयीन मुलगा तिथे आला. त्याने तिच्या मुलांना गाडीत बसवून फिरवून आणतो असे सांगून घेऊन गेला. त्यावेळी दुसरे दोन आरोपी आधीच गाडीमध्ये बसले होते.

आरोपी सोन कॉलनीतील शिव मंदिराजवळ मासे बाजाराजवळील एका जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये महिलेला घेऊन गेले आणि तिथे त्यांनी पीडित महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यावेळी आरोपींनी पीडित महिलेच्या मुलांना मोबाइल देत गप्प केले. महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला सोडून पळ काढला. यावेळी महिलेच्या हातात त्यांनी २०० रुपये ठेवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत काही तासांत त्यांना अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group