मोठी घडामोड ! आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? काय घडतंय ?
मोठी घडामोड ! आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? काय घडतंय ?
img
Nandini khandare More

राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटही सत्तेसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या 15 दिवसात राजकारण तापलेले आहे. दरम्यान आता शरद पवार गट हा एनडीएमध्ये सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी भाजपकडून एक स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे कळते. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, दोन्ही पक्षांचे विलिनीकरण व्हावे. त्यानंतरच एनडीएमध्ये सहभागी होता येईल असे भाजपने स्पष्ट केले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यानुसार, दोन्ही स्वतंत्र राष्ट्रवादी ऐवजी विलिनीकरणानंतरच शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होता येईल.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार राष्ट्रवादीने नवीन सूर आळवला आहे. 50 टक्के जागा फॉर्म्युल्यावर विचार होऊ शकतो, असे त्यांनी भाजपला कळवले आहे. या विधेयकावर INDIA आघाडीतील घटक पक्षांचे मन वळवलेही जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. याचा अर्थ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील खासदार भाजपमध्ये विलीन होणार नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन एनडीएसोबत राहतील आणि दोन्ही गटाला एक एक मंत्रिपद देण्यात येईल अशी चर्चा होत आहे. शरद पवार गटाचे लोकसभेत 8 खासदार आणि एक राज्यसभा खासदार आहे.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी शरद पवारांच्या पाठिंब्याची गरज

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूरीसाठी केंद्र सरकाला शरद पवार यांच्या आठ लोकसभा खासदार आणि एका राज्यसभा खासदारांची मोठी मदत होईल. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी INDIA आघाडीत याविषयी अगोदर चर्चा होईल. एक सामूहिक निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडामोडींकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. पवार काय निर्णय घेतात यावर पुढील अनेक गणितं अवलंबून असतील.

इतर बातम्या
Join Whatsapp Group