अत्यंत मोठी  दुर्घटना ! बंगालच्या उपसागरात दोन बोटी उलटल्या, 500 हून अधिक जणांच्या मृत्यूची भीती
अत्यंत मोठी दुर्घटना ! बंगालच्या उपसागरात दोन बोटी उलटल्या, 500 हून अधिक जणांच्या मृत्यूची भीती
img
Nandini khandare More
सध्या जगभरात अनेक दुर्दैवी  घटना घडत आहेत. दरम्यान आता बंगालच्या उपसागरातून एक अत्यंत वेदनादायी आणि मोठी जागतिक दुर्घटना समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात दोन बोटी उलटल्या  500 हून अधिक जणांच्या मृत्यूची भीती व्यक्तकेली जात आहे. 

म्यानमारमधून पळून जाणाऱ्या रोहिंग्या समुदायाच्या लोकांची वाहतूक करणाऱ्या दोन बोटी समुद्रात बुडाल्या आहेत. या भीषण दुर्घटनेत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांनी या घटनेची दखल घेत, अलिकडच्या वर्षांतील रोहिंग्या निर्वासितांशी संबंधित ही सर्वात मोठी आणि प्राणघातक सागरी आपत्ती असू शकते, असा इशारा दिला आहे.

 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन' आणि संयुक्त राष्ट्रांचे निर्वासित उच्चायुक्त यांनी गुरुवारी या दुर्घटनेबाबत एक संयुक्त निवेदन जारी केले. प्राथमिक माहितीनुसार, या दोन्ही बोटी जून महिन्याच्या अखेरीस म्यानमारच्या संघर्षग्रस्त राखाईन राज्यातून निघाल्या होत्या. सुमारे २५० प्रवासी असलेल्या पहिलाया बोटीने प्रवास सुरू केल्यानंतर काही वेळातच बोटीचा संपर्क तुटला. तर सुमारे २८० प्रवासी असलेली दुसरी बोट ८ जुलै २०२६ रोजी म्यानमारच्या 'आययारवाडी' किनारपट्टीजवळ समुद्रात उलटल्याचा अंदाज आहे. दोन्ही संस्थांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, "या दोन्ही घटना आणि मृतांच्या अधिकृत आकड्याला अद्याप प्रशासकीय दुजोरा मिळालेला नसला, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या संभाव्य जीवितहानीमुळे आम्ही अत्यंत चिंतेत आहोत."

मान्सूनच्या काळात धोकादायक प्रवास सध्या मान्सूनचा काळ असल्याने बंगालच्या उपसागरात समुद्रा खवळलेला असतो. अशा धोकादायक हवामानात रोहिंग्या नागरिक सहसा समुद्रातून प्रवास करण्याचे टाळतात. मात्र, या भागात झालेला मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थिती यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली होती. अशा बिकट स्थितीतही जीव वाचवण्यासाठी किंवा चांगल्या आयुष्याच्या शोधात निर्वासितांनी हा अत्यंत धोकादायक प्रवास सुरू केला आणि अखेर काळानं त्यांच्यावर घाला घातला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group