थरारक ! ऐन  बोगद्यात कारला आग, शेकडो गाड्या अडकल्या; नागरिकांची तारांबळ
थरारक ! ऐन बोगद्यात कारला आग, शेकडो गाड्या अडकल्या; नागरिकांची तारांबळ
img
Nandini khandare More


एका थरारक अपघाताची बातमी समोर आली आहे. ऐन बोगद्यात एका कारला भीषण आग लागली असल्याची घटना घडली आहे. या घटनेनं उपस्थित नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती . 

 मुंबईतील कोस्टल रोडवर अपघात झाला आहे. गाड्यांची एकमेकांना टक्कर झाली असून एका गाडीला आतमध्ये आग लागल्याचे वृत्त आहे. तेथे अनेक गाड्या अकडून पडल्या असून आगीमुळे धूरही येत आहे. नरीमन पॉईंटवरून कोस्टल रोडच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. या घटनेचा एका व्हिडीओही समोर आला असून बोगद्याच्या आतमध्ये शेकडो गाड्या एकमेकांमागोमाग अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडच्या बोगद्यात एक दुर्घटना घडली. तेथे एका कारला आग लागली.  कोस्टल रोडवरून जाणाऱ्या धावत्या कारला अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ माजला. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही

मुंबईतील अत्यंत महत्वाचा असा वाहतूक मार्ग म्हणजे कोस्टल रोड.  याच कोस्टल रोडलवर जिथे बोगदा सुरू होतो, त्याचा ठिकाणी हा दुर्दैवी अपघात झाला. या भीषण अपघातामुळे कोस्टल रोडवरून धावणाऱ्या जवळपास 450  ते 500 हून अधिक गाड्या या ठिकाणी अडकून पडल्या आहेत. या घटनेनंंतर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली, तसेच अग्निशमन दलाला, अँब्युलन्सलाही फोन करण्यात आला आहे.

ट्राफिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तिथे यावं आणि बोगद्यात अडकलेल्या गाड्यांना मार्गदर्शन करून, त्यांना तिथून वेगळा मार्ग तयार करून द्यावा, अशी मागणी होत आहे.  तसेच अग्निशमन दलाला देखील त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे. लवकरात लवकर येईन त्यांनी गाड्यांना लागलेली आग विझवावी अशी मागणी करण्यात आली.थोड्याच पोलिस तसेच ट्राफिक दलाचे अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल आणि त्यांनी असून तिथे अडकलेल्या गाड्यांना मार्गदर्शन केलं. हळूहळू त्या गाड्या रिव्हर्स घेऊन बाहेर काढत मार्ग मोकळा केला गेला.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group